लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. या लोकलविषयी मुंबईकरांना खूपच आत्मीयता आहे. यामुळेच शहराबाहेर गेले की आमची लोकल कती चांगली आहे याचे ते तोंडभरून कौतुक करत असतात. पण हेच मुंबईकर या गाडीला पाच मिनिटे जरी वेळ झाला तरी रेल्वे व्यवस्थेवर तोंडसुख घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. मात्र ही लोकलसेवा कोणत्याही परिस्थित सुरू राहावी यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा अव्याहत काम करत असते. याच ‘रेल्वे व्यवस्थापन प्रणाली’विषयी जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पाच मिनिटे झाली एकही गाडी आली नाही. या रेल्वे कर्मचाऱ्यांचे ना लक्षच नसते.’ दादरच्या प्लॅटफॉर्मवर एक तास उभे राहिल्यास किमान तीन ते चार वेळा तरी प्रवशांकडून अशी वाक्ये कानी पडतात. प्रवाशाला कुठे तरी पोहचायचे असते. तेथे जाण्यास उशीर झाल्यामुळे त्याच्या जिवाची ही घालमेल सुरू असते. मात्र संपूर्ण दिवसभरात असाही एकही क्षण येत नाही की, गाडी विनाकारण थांबवून ठेवण्यात आली आहे. या गाडय़ा चालविण्याची यंत्रणाच अशी तयार करण्यात आली आहे. याला ‘ट्रेन व्यवस्थापन प्रणाली’ असे म्हणतात. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील विभागीय कार्यालयात पहिल्या मजल्यावर एक भलीमोठी अर्धवर्तुळाकार इलेक्ट्रॉनिक भिंत बसविण्यात आली आहे. या भिंतीवर चर्चगेट ते विरार या ६० किमीच्या मार्गावर ट्रॅकवर असणाऱ्या सर्वच गाडय़ांची सद्य:स्थिती दिसत असते. कोणती गाडी कोणत्या स्थानकात आहे इथपासून ते तिचा प्रवास वेळापत्रकानुसार सुरू आहे की नाही इथपर्यंतचा सर्व तपशील यामध्ये समजतो. तसेच जर गाडीच्या नियमित प्रवासात आयत्या वेळी कोणताही बदल करावयाचा असेल तर त्याची सूचना देण्याची सुविधाही या ठिकाणी आहे. यालाच नियंत्रण कक्ष असे म्हटले जाते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inside story of mumbai local train control room
First published on: 26-07-2017 at 03:36 IST