मुंबई : संशोधक आणि रासायनिक अभियंते प्रा. गणपती यादव, ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, एल्के केमिकल्स’चे संस्थापक डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू पद्मभूषण बी. एन. सुरेश यांची वॉशिंग्टन येथील ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयिरग’च्या (एनएई) आंतरराष्ट्रीय सभासदपदी निवड झाली आहे. एनएईचे अध्यक्ष जॉन एल. अ‍ॅन्डरसन यांनी १११ नव्या सभासदांची आणि २२ आंतरराष्ट्रीय सभासदांची निवड यादी नुकतीच जाहीर केली. नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयिरग, वॉशिंग्टनच्या सभासदपदासाठी जगभरातील नामवंत अभियंत्यांची निवड करण्यात येते.  अभियांत्रिकी संशोधन तसेच शिक्षण, तंत्रज्ञानाच्या आधारावरील विकसनशील संशोधन आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे सभासदपद देण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’चे (आयसीटी) माजी कुलगुरू डॉ. यादव यांनी हरित रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयावर संशोधन केले आहे. त्यांचे या विषयांवरील ४९१ शोधनिबंध आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांच्या नावावर ११३ राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पेटंट आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Institute of chemical technology ict akp
First published on: 13-02-2022 at 01:19 IST