वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा बसविण्याच्या कामाची रखडपट्टी

मुंबई : बेशिस्त वाहनचालकांना लगाम लावण्यासाठी, वाहतूक नियंत्रित करून अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर  वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा (इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम-आयटीएमएस) बसविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. यासाठी निविदाही काढली असून मागील अनेक महिन्यांपासून या निविदेला अंतिम रूप मिळू शकलेले नाही. त्यामुळे ही यंत्रणा बसविण्याची आणि द्रुतगती मार्गावरील प्रवास सुरक्षित होण्याची प्रतीक्षा वाढतच आहे.

Potholes on MTNL-LBS route elevated road in BKC 50 lakhs fine to the contractor
बीकेसीतील एमटीएनएल-एलबीएस मार्ग उन्नत रस्त्यावर खड्डे; उन्नत रस्ता वाहतुकीसाठी बंद, कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड
new access controlled route project to link major cities in mmr area
विश्लेषण : ठाणे, मुंबई, नवी मुंबईला ‘चौथी मुंबई’ जोडण्यासाठी नवा रस्ता? काय आहे हा प्रकल्प? 
roads, NAINA, Re-tendering, tender,
‘नैना’तील रस्त्यांसाठी पुन्हा निविदा, तीन हजार ४७६ कोटींच्या निविदा जाहीर, पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने रस्ते बांधणीची कामे
six policemen for patrolling during accident on mumbai pune expressway
द्रुतगती महामार्गावर अपघाताच्या वेळी सुरक्षेसाठी फक्त सहा पोलीस!
concreting, National Highway Authority,
शहरबात : उशिरा सुचलेले…
Thane-Borivali double tunnel,
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा : अकरा हजार कोटींवरून अठरा हजारांवर गेलेल्या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
nashik Mumbai journey marathi news
खड्डे, वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई प्रवासाला आठपेक्षा अधिक तास, महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सोमवारी मंत्रालयात बैठक
Several infrastructure projects are nearing completion
पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर; मेट्रो रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ

सुमारे ९४ किमी लांबीच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून दररोज अंदाजे ६० हजार वाहने धावतात. या मार्गासाठी वेगमर्यादा निश्चित करून देण्यात आली असून कडक नियमही आखून देण्यात आलेले आहेत. मात्र वेगमर्यादा आणि अन्य वाहतूक नियमांचे पालन वाहनचालक करीत नाहीत, तर वाहतूक नियंत्रणासाठी सध्याची यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने येथे अत्याधुनिक अशी वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी अंदाजे १६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. द्रुतगती मार्गावर वाहतूक शिस्त लागावी, अपघात टाळावे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी; जलद, अचूक, तसेच पारदर्शक पद्धतीने टोलवसुली व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशी यंत्रणा महामार्गावर बसविण्यात येणार आहे.

संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून वाहनांचा वेग तपासणारी ‘अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ बसविण्यात येणार आहे,

तर ३४ ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना शोधणारी ‘लेन डिसिप्लेन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’ बसविण्यात येणार आहे.

४० कोटींचा निधी रखडला

या यंत्रणेसाठी एमएसआरडीसीने २०१९ मध्ये निविदा काढली आहे. तीन कंपन्यांनी निविदा सादर केली असून निविदा अंतिम करण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अनेक महिने उलटले तरी अद्याप निविदा अंतिम झालेली नाही. त्यामुळे ही यंत्रणा बसविण्याचे काम रखडले आहे, तर दुसरीकडे यासाठी राज्य सरकारने ४० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. मात्र हा निधीही अद्याप एमएसआरडीसीच्या हातात आलेला नाही. निविदेसंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच निविदा अंतिम होईल आणि त्यानंतर कामाला सुरुवात होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.