पुढील आर्थिक वर्षांत इंटरनेट सुविधांचा विस्तार करण्यात येणार असून नेक्स्ट जनरेशन नेटवर्कच्या माध्यमातून ४ लाख जोडण्या देण्यात येतील. तसेच राज्यातील ५८ शहरांत १७४ ठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट (क्षेत्रे) विकसित करणार असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. १०० कोटी ग्राहकांपर्यंत मोबाइल तर ४० कोटी ग्राहकांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचल्या. देशातील २५६ शहरांत २५०० वाय-फाय क्षेत्रे तयार केली जातील. त्यातील ५८ शहरांतील १७४ क्षेत्रे महाराष्ट्रात असतील. महाराष्ट्र व गोवा विभागातील पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण आणि नांदेड शहरांत नेटवर्कच्या साहाय्याने वेगवान इंटरनेट सुविधा पुरवण्यात येतील.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2016 रोजी प्रकाशित
वर्षभरात देशातील इंटरनेट सुविधांचा विस्तार
नेक्स्ट जनरेशन नेटवर्कच्या माध्यमातून ४ लाख जोडण्या देण्यात येतील.
Written by मंदार गुरव

First published on: 11-01-2016 at 02:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internet services growth increase in india this year