मुंबई : एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध निनावी तक्रार आल्यानंतर त्याच्याकडून स्पष्टीकरण का मागितले जाऊ शकत नाही, असा प्रश्न उच्च न्यायालयाने बुधवारी उपस्थित केला. आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांनी याबाबत केलेल्या दाव्याच्या निमित्ताने न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला. पाटील यांच्या अर्जावर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) दिलेल्या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे प्रकरण ऑक्टोबर २०२१ मधील आहे. नाशिकमध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत असताना पाटील यांच्याविरोधातील निनावी पत्र राज्य सरकारला मिळाले होते. १६१ कनिष्ठांची बदली केल्याप्रकरणी हे पत्र पाठवण्यात आले होते. या पत्राची दखल घेऊन राज्य सरकारने पाटील यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्याविरोधात त्यांनी कॅटमध्ये धाव घेतली होती. कॅटने त्यांच्या बाजूने निर्णय दिला होता.
निनावी तक्रारीची दखल घेऊन स्पष्टीकरण का मागू नये ? सचिन पाटील यांच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचा प्रश्न
आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांनी याबाबत केलेल्या दाव्याच्या निमित्ताने न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला. पाटील यांच्या अर्जावर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) दिलेल्या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
Written by लोकसत्ता टीम
मुंबई
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-02-2024 at 11:28 IST
TOPICSआयपीएस अधिकारीIPS Officerमराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbaiमुंबई उच्च न्यायालयBombay High Courtमुंबई न्यूजMumbai News
+ 1 More
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ips officer sachin patil high court central administrative tribunal cognizance of an anonymous complaint mumbai print news css