मुंबई : जम्मू-काश्मीरहून मुंबई, महाराष्ट्रात चरस तस्करीप्रकरणात नाव पुढे आल्यानंतर मुंबईच्या विशेष न्यायालयाने इक्बाल कासकर याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याची परवानगी अमलीपदार्थविरोधी पथकाला (एनसीबी) दिली. खंडणीच्या गुन्ह्यात ठाणे कारागृहात ठेवण्यात आलेल्या इक्बालचा तांत्रिक ताबा एनसीबीने बुधवारी घेतला. गुरुवारी त्याला प्रत्यक्ष ताब्यात घेऊन चौकशी के ली जाईल. इक्बाल कु ख्यात दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ आहे.

गेल्या आठवड्यात शाबीर शेख आणि निझामुद्दीन ताझा या दोन तरुणांना एनसीबीने भिंवडी येथून अटक केली. त्यांच्याजवळ १२ किलो चरस सापडले. हे चरस दोघांनी जम्मूहून आणले होते. चौकशीदरम्यान दोघांनी इक्बालचे नाव घेतले. त्यानंतर एनसीबीने इक्बालला चौकशीसाठी ताब्यात घेण्याची परवानगी मागणारा अर्ज विशेष न्यायालयात के ला. तो विशेष न्यायालयाने मंजूर के ला. तसेच न्यायालयाने इक्बालच्या नावे ‘प्रॉडक्शन वॉरंट’ही जारी के ले.