मुंबई :  गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरील सुनावणीवेळी केलेल्या टिप्पणीच्या नोंदी सादर करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांना दिले.आपल्यावरील आरोप हा जामीनपात्र आहे. असे असतानाही महानगरदंडाधिकारी आर. आर. खान यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला. आपला या न्यायालयावर विश्वास नाही आणि हे न्यायालय पक्षपाती असल्याचा आरोप करत कंगनाने हे प्रकरण अन्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची मागणी मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे केली होती. अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी एस. टी. दंडे यांच्यासमोर शुक्रवारी कंगनाच्या अर्जावर सुनावणी झाली.