ठाण्यातील धोकादायक आणि बेकायदा इमारतींच्या पुनर्विकासाठी क्लस्टर योजनेला मंजुरी मिळावी या मागणीसाठी शुक्रवापासून उपोषणाला बसलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज रविवार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठोस कृतीचे आश्वासन दिल्यानंतर आपले उपोषण मागे घेतले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यावर ठोस कृती करणार असल्याचे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री गुरूवारी ठाणे जिल्ह्यातील नेत्यांशी बैठक घेणार असल्याचेही आव्हाडांनी सांगितले. जितेंद्र आव्हाडांचे मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर बोलणे झाले. तसेच यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून उदय सामंत यांनी उपोषणकर्त्याशी चर्चा केली.
‘आव्हाडपंथी’ राजकारणाला बक्षिसी!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आयोजित करण्यात आलेला ठाणे दौरा रद्द झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. पक्षीय कार्यक्रमाचे निमित्त साधून मुख्यमंत्री ठाण्यातील काही धोकादायक इमारतींची पहाणी करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच त्यांचा मुंब्रा परिसराचा धावता दौरा घडवून आणण्याचे बेतही आखले जात होते. परंतु, मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने उपोषण आणखी लांबणार असेच चित्र होते. परंतु, तसे झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून आव्हाडांशी संपर्क साधला आणि ठाण्यातील क्लस्टर पुर्नविकासाकडे लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.
ठाण्यात राष्ट्रवादीत अस्वस्थता मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द
अतिक्रमणे पाडण्यात आव्हाडांचा कोलदांडा
संग्रहित लेख, दिनांक 6th Oct 2013 रोजी प्रकाशित
जितेंद्र आव्हाडांचे उपोषण मागे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठोस कृतीचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे पृथ्वीराज चव्हाण यावर ठोस कृती करणार असल्याचे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

First published on: 06-10-2013 at 06:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad takes back the hunger strike