१३ ते २४ मे दरम्यान दुरुस्तीचे काम 

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीए) पूर्व द्रुतगती मार्गावरील जेव्हीएलआर (जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता) उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.  पुलाच्या विभिन्न भागांतील सांधे भरण्याचे काम १३ ते २४ मे दरम्यान केले जाणार असून या काळात पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. यादरम्यान वाहतूक वळविण्यात येणार असून रस्त्यावर कोंडी होण्याची शक्यता आहे.  या उड्डाणपुलाच्या २०० बेअरींग बदलण्यासह एक्सपान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम तीन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले. वाहतूक बंद न करता बेअरींग बदलण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २०० पैकी १४८ बेअरींग बदलण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. जितके बेअरींग बदलण्यात आले आहेत, त्या भागातील एक्सपान्शन जॉइंट आता बदलण्यात येतील. या कामासाठी मात्र उड्डाणपूल बंद ठेवावा लागणार आहे. या काळात उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू राहील.

 असेही अधिकाऱ्याने सांगितले. महत्त्वाचे म्हणजे एक्सपान्शन जॉइंट बदलण्याचे काम दुसऱ्या टप्प्यातही करण्यात येणार आहे. यानंतरही एक्सपान्शन जॉइंट बदलण्यासाठी उड्डाणपूल काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.