मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा बुधवारपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून प्रदेश राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसह अनेक बैठका आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आगामी लोकसभा-विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीने पक्षांतर्गत तयारीचा आढावा ते घेणार आहेत. मुंबई प्रदेश सुकाणू समितीच्या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवडणूक तयारीचा गोषवारा त्यांना सादर करण्यात येणार आहेत.

नड्डा यांचे प्रत्येक राज्यात दौरे सुरू असून त्यात निवडणूक तयारीचा आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार नड्डा हे बुधवारी सकाळी मुंबईत येत असून देवनार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिवादन करतील. घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडवर आरबीके हॉल येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद, बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानात विविध क्षेत्रातील बुद्धिवंतांशी संवाद आणि चारकोप येथे पन्ना प्रमुखांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. नड्डा हे रमाबाई आंबेडकर नगरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अभिवादन करणार असून एका दलित कार्यकर्त्यांच्या घरी दुपारचे भोजन घेणार आहेत. मुंबईतील पक्षाच्या मोर्चा व आघाडी प्रमुखांशी संवादासह मुंबई भाजपच्या सुकाणू समितीची बैठकही नड्डा सह्याद्री अतिथीगृहावर रात्री घेणार आहेत

eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात
amar kale wardha marathi news, ramdas tadas marathi news
वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?

नड्डा हे गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून प्रभादेवीला जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील आणि दादर येथे सावरकर स्मारकासही भेट देणार आहेत, असे मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सांगितले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी पुण्यात होत असून नड्डा यांच्या उपस्थितीत बैठकीचा समारोप होणार आहे. या बैठकीनंतर नड्डा हे राज्यातील खासदार व आमदारांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते राज्यातील केंद्रीय मंत्री व राज्यातील मंत्र्यांशी संवाद साधतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पुण्यात उद्या राज्यस्तरीय बैठक

पुणे : भारतीय जनता पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवारी (१८ मे) पुण्यात होणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून, निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी १०ला होणार आहे. बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदार, खासदार आणि एक हजार २०० पदाधिकारी उपस्थित राहतील. सायंकाळी पाचला बैठक संपणार असून, त्यानंतर आमदार आणि खासदारांची घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑर्ट गॅलरी येथे स्वतंत्र बैठक होणार आहे.