मुंबई : देखभालीच्या कामांसाठी रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या बोरिवली व गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर पश्चिम रेल्वेने जम्बो ब्लॉक घेतला आहे. या काळात अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल गाडय़ा जलदगती मार्गावरून नेण्यात येणार आहेत. त्यामुळे जलद गाडय़ांचे वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता आहे. तसेच अनेक गाडय़ा रद्द केल्या जाण्याचीही शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या ब्लॉकच्या काळात बोरिवलीच्या १, २, ३ व ४ क्रमांकाच्या फलाटावरून एकही गाडी सुटणार नाही, असेही पश्चिम रेल्वेने कळवले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jumbo block between borivali to goregaon on sunday zws
First published on: 22-11-2019 at 02:14 IST