संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या रवी पुजारी याचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यास सोमवारी कर्नाटक न्यायालयाने नकार दिला. यावेळी कर्नाटक पोलिसांनी एका गंभीर गुन्ह्य़ात न्यायालयीन प्रक्रिया अपूर्ण राहिल्याची सबब पुढे करून मुंबई पोलिसांच्या अर्जाला विरोध के ला होता. तेथील न्यायालयाने ती ग्राह्य़ धरल्याचे, गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटक पोलिसांनी पुजारील फेब्रुवारी महिन्यात सेनेगल येथून प्रत्यार्पित केले होते. तेथे दाखल गुन्ह्य़ांचा तपास पूर्ण के ल्यानंतर पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळणार होता. गेल्या आठवडय़ात गुन्हे शाखेने पुजारीचा ताबा घेण्यासाठी न्यायालयातून ट्रान्स्फर वॉरंट मिळवले. मात्र एका दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा खटला दंडाधिकारी न्यायालयातून सत्र न्यायालयात वर्ग करण्याची प्रक्रिया शिल्लक आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka court refuses to hand over ravi pujari abn
First published on: 07-07-2020 at 00:26 IST