२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेले राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. मुंबईतील हिंदूजा रुग्णालयाकडून त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले आहे. करकरे यांच्या मुलाने त्यांच्या शरीरातील अवयव दान करण्यास रुग्णालयाला परवानगी दिली आहे. शनिवारी रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर मेंदूतील रक्तस्रावामुळे त्या कोमात गेल्याने त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. अखेर सोमवारी सकाळी रुग्णालयाकडून त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. दादर येथील पोलीस वसाहतीत राहात असलेल्या कविता करकरे शिक्षिका होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2014 रोजी प्रकाशित
कविता करकरे यांचे मुंबईत निधन
२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेले राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.

First published on: 29-09-2014 at 03:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kavita wife of former ats head hemant karkare passed away at hinduja hospital