अभिनेत्री केतकी चितळेला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २०२० मध्ये बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केतकीवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बौद्ध धर्माविषयी आक्षेपार्ह मजकूर

केतकीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. हा गुन्हा दोन वर्षांपूर्वी झाला होता. तसेच केतकीचा जबाब रबाळे पोलिसांनी यापूर्वीच घेतला होता. त्यामुळे तिला पोलीस कोठडीची आवश्यता नसल्याचे केतकीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले होते. तर, याप्रकरणाचा तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला होता. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी याप्रकरणी तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता तिला ७ जूनपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शरद पवारांवरही आक्षेपार्ह पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली असून २६ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.