तीन दिवसांपूर्वी मुंबईत एका २३ वर्षीय एअर हॉस्टेसची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय सफाई कर्मचारी विक्रम अटवाल याला अटक केली आहे. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता अंधेरी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आरोपीनं हत्येची कबुली दिली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुपल ओग्रे असं खून झालेल्या २३ वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती मुळची छत्तीसगड येथील रहिवासी असून एअर इंडिया कंपनीत प्रशिक्षणार्थी एअर होस्टेस म्हणून ती काम करत होती. घटनेच्या दिवशी आरोपीबरोबर हाणामारी सुरू असताना तिने कथितपणे आरोपीच्या हातातून विळा हिसकावून घेतला होता. त्यानंतर तिने लाकडी हँडलने आरोपीच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. “तिने आरोपीला आणखी जोराने मारहाण केली असती तर आजचं चित्र वेगळं असतं” अशी प्रतिक्रिया एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. याबाबतचं वृत्त ‘मिड डे’नं दिलं आहे.

हेही वाचा- मुंबईत दोन सावत्र मुलांसह नवऱ्याकडून महिलेवर गँगरेप; तीन महिने सुरू होता अत्याचार, मोबाइलमध्ये आढळले ७०० व्हिडीओ

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं सांगितलं, “त्याने पोलिसांसमोर कबूल केले की तो महिलेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने घरात घुसला होता.” पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने आपल्या कपड्यात एक विळा लपवला होता. पीडितेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने तो घरात घुसला. पण तिने प्रतिकार केल्याने त्याने घाबरून तिचा गळा चिरला. दरम्यान, पीडितेनं आरोपीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर ओरखडे ओढले.

हेही वाचा- तोंडात बोळा कोंबून वडिलांचा अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार, पत्नीच्या मृत्यूनंतर १५ दिवसांतच…

पवई पोलिसांनी अंधेरी न्यायालयात सांगितलं की, त्यांना आरोपी अटवाल (४०) याच्या पोलीस कोठडीची गरज आहे. कारण त्यांनी पीडितेचा खून केलेले हत्यार आणि आरोपीचे कपडे अद्याप जप्त केले नाहीत. त्यांना हत्येचा घटनाक्रमही पडताळून पाहायचा आहे. तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे, असंही पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांनी दावा केला की, आरोपी अटवाल आणि पीडितेमध्ये शुक्रवारी आणि रविवारी सकाळी शाब्दिक वाद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्रम अटवाल याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर यामध्ये आणखी कलमे जोडले जातील, असंही पोलिसांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Killer enter in house to rape but murdered by slit throat of air hostess rupal oghre crime in mumbai rmm
First published on: 06-09-2023 at 18:49 IST