मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची  आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी तीन तास चौकशी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमय्या सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास आर्थिक गुन्हे  शाखेत आले होते. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास ते आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले. मी पोलिसांना सर्व सहकार्य केले असल्याचे यावेळी सोमय्या सांगितले.

आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली गोळा केलेला ५७ कोटी रुपये निधी राज्यपाल कार्यालयात जमा न करता त्याचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यांतील रक्कम १० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकारणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या यांच्यासह त्यांचा मुलगा निल सोमय्या यांना समन्स बजावले होते. आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात   सोमय्या यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya questioned for three hours by city economic offences wing zws
First published on: 19-04-2022 at 03:26 IST