मुंबई : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या दोषींना येरवडा कारागृहातून पुढील शिक्षण सुरू ठेवण्यास उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. दोषींची शिक्षण घेण्याची इच्छा स्वागतार्ह आहे, असे नमूद करून या दोघांच्या मागणीबाबत येरवडा तुरुंग अधिकाऱ्यांनी मानवतावादी दृष्टिकोन दाखवून दोषींना आवश्यक मदत करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याच्या आरोपांत जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुमे या दोघांना अहमदनगर येथील सत्र न्यायालयाने २०१७ मध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. राज्य सरकारने नियमानुसार, आरोपींची फाशी कायम करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे, तर शिंदे आणि भैलुमे यांनीही फाशीला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून प्रकरण प्रलंबित आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2022 रोजी प्रकाशित
कोपर्डी बलात्कार प्रकरण : फाशीची शिक्षा झालेल्या दोघांना शिक्षण पूर्ण करण्यास परवानगी
येरवडा तुरुंग अधिकाऱ्यांनी मानवतावादी दृष्टिकोन दाखवून दोषींना आवश्यक मदत करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 30-04-2022 at 00:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kopardi rape case bombay high court allows two convicts to complete education zws