मराठीसह अन्य भाषांच्या अकादमीची कार्यालये
मुंबईतील धोबी तलाव परिसरातील रंगभवन येथील खुल्या नाटय़गृहाच्या जागेवर भव्य व सुसज्ज असे भाषा भवन बांधण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
भाषा भवन म्हणून उभारण्यात येणाऱ्या इमारतीत मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही कार्यालये, सुसज्ज ग्रंथालय, तसेच सिंधी, उर्दू व गुजराती अकादमीची कार्यालयेही असतील, अशी माहिती शासनाच्या वतीने देण्यात
आली.
देशातील विविध राज्यांनी त्यांच्या मातृभाषेचा विकास, संवर्धन व जतन करण्यासाठी भाषा भवनाची उभारणी केली आहे. महाराष्ट्रात मात्र तसे स्वतंत्र भवन नव्हते. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मराठी भाषेची कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांमध्ये समन्वय राहावा व ती एकाच इमारतीत असावीत यासाठी रंगभवनच्या जागेवर भाषा भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र असे नाव देण्यात येणार आहे.
या भवनात भाषा विभागाशी संबंधित सर्व कार्यालयांव्यतिरिक्त अनुवाद केंद्र, बोली अकादमी, मराठी भाषा संशोधन, प्रयोग शाळा, प्रशिक्षणार्थीसाठी वसतिगृह, पुस्तक विक्री केंद्र, प्रदर्शन सभागृह, तसेच १९८ आसनी छोटे प्रेक्षागृह असेल.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2013 रोजी प्रकाशित
रंगभवनच्या जागेवर ‘भाषा भवन’
मराठीसह अन्य भाषांच्या अकादमीची कार्यालये मुंबईतील धोबी तलाव परिसरातील रंगभवन येथील खुल्या नाटय़गृहाच्या जागेवर भव्य व सुसज्ज असे भाषा भवन बांधण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
First published on: 11-07-2013 at 03:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Language bhavan on the land of drama theatre