कल्याण पूर्व विभागातील कोळशेवाडीत राहणाऱ्या लोकप्रिय गायक दिवंगत प्रल्हाद शिंदे यांच्या नातवास लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शनिवारी अटक केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थक शिंदे याने एका तरूणीशी विवाहाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवले होते. त्यातून ती तरूणी गर्भवती राहिल्याने समर्थकने तिच्याशी लग्न केले. मात्र लग्नानंतरही पत्नीला घरी घेऊन जाण्यास तो तयार नव्हता. अखेर तिने याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. समर्थकचा भाऊ सार्थक तसेच वडिल दिनकर आणि आईने घरासाठी पैसे मागितल्याचा आरोपही तिने केला आहे.
याप्रकरणी समर्थक आणि त्याचे वडिल दिनकर यांना अटक करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2013 रोजी प्रकाशित
विवाहाच्या आमिषाने बलात्कार
कल्याण पूर्व विभागातील कोळशेवाडीत राहणाऱ्या लोकप्रिय गायक दिवंगत प्रल्हाद शिंदे यांच्या नातवास लग्नाचे आमिष
First published on: 15-09-2013 at 05:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Let singer pralhad shindes grandson samarthak shinde arrested in rape case