भायखळा येथील एका कचरा कुंडीत दोन दिवसांचे पुरुष जातीचे अर्भक सापडले. सोमवारी सकाळी स्थानिक रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला. त्याच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
माझगावच्या खोजा कब्रस्तानजवळ कचराकुंडीत हे अर्भक स्थानिक रहिवाशांना आढळले. प्लॅस्टिकच्या पिशवीत ते गुंडाळलेले होते. सकाळी पावणेनऊच्या सुमारास नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल केले. भायखळा पोलिसांनी त्याला कचराकुंडीत फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाळाची पूर्ण वाढ झालेली होती असे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी परिसरातील रुग्णालये, प्रसूतीगृहांतून तपास सुरू केला असून गरोदर महिलांचीही माहिती मागवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live infant found in garbage box
First published on: 03-09-2013 at 03:32 IST