प्रभादेवीत मंगळवारी गुंतवणूक जागर आणि ‘अर्थब्रह्म’चे प्रकाशन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणतीही करवाढ नसलेला किंबहुना कर दिलासा असलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पाने सर्वानाच खुश केले आहे. भांडवली बाजाराच्या उत्साही भरारीने सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांना त्यांच्या उच्चांकांच्या समीप आणून ठेवले आहे. तथापि प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक अंदाजपत्रकाला योग्य दिशा देणारे वळण हे गुंतवणुकीचे गणित जुळवून शक्य आहे. याचे नेमके मार्गदर्शन ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ गुंतवणूकदार जागरातून होणार आहे.

‘बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक आणि अर्थनियोजनाचे दिशादर्शन’ हा   अर्थसाक्षरतेचा जागर मंगळवार, २८ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता, रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी, दादर (पश्चिम) येथे होत आहे. या उपक्रमाचे सहप्रायोजक गजराज बिल्डर्स, वास्तू रविराज हे आहेत. तर पॉवर्ड बाय पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, केसरी टुर्स, पुराणिक बिल्डर्स असून, बँकिंग पार्टनर जनकल्याण सहकारी बँक आहे.

अर्थसंकल्पातील बदललेल्या तरतुदींनुरूप २०१७-१८ सालात वैयक्तिक आर्थिक नियोजन कसे करावे. तसेच या वर्षांत भांडवली बाजार वा अन्य पर्यायातून आपली गुंतवणूक अधिक लाभदायी कशी करून घ्यावी, याची  उत्तरे असलेल्या ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ या वार्षिकांकाचे प्रकाशनही या निमित्ताने होत आहे. या अंकाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे.

याच कार्यक्रमात अर्थसंकल्पानंतर करावयाच्या गुंतवणुकीवर तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शन करतील. श्रोत्यांना त्यांच्या नेमक्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरेही यावेळी तज्ज्ञांकडून मिळविता येईल.

सर्वासाठी खुल्या आणि विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमात, बचत, गुंतवणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शक ठेवा असलेल्या ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ची प्रत वाचकांसाठी उपलब्ध असेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta arth brahma
First published on: 26-02-2017 at 02:48 IST