महाराष्ट्रातील विविध पाककृतींशी ओळख करून देणाऱ्या ‘पितांबरी रुचियाना गूळ’ प्रस्तुत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म २०१७’ या विशेषांकाला खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यासह जगभरातील खवय्यांच्या प्रतिसादामुळे या विशेषांकाची जोरदार व्रिकी सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा हा चौथा वार्षिकांक आहे. हा विशेषांक २५ जुलै रोजी प्रकाशित होऊन तो सर्वत्र उपलब्ध झाल्यानंतर खवय्यांनी त्याचे स्वागत केले. विविध खाद्यपदार्थाची सचित्र माहिती असलेला खाद्यसंस्कृतीचा हा कोश वाचकांच्या पसंतीस उतरला. पंधरवडय़ातच या विशेषांकाची विक्रमी विक्री झाली.

राज्यातील विविध भागांतील वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीची रसदार ओळख करून देणाऱ्या पाककृती या विशेषांकात आहेत. शाकाहारी पाककृतींबरोबरच यंदा मांसाहारी पाककृतींची चमचमीत मेजवानी खवय्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रसिद्ध पाककृतीतज्ज्ञ उषा पुरोहित, कल्पना तळपदे, शुभा प्रभू-साटम, अलका फडणीस, दीपा पाटील, रचना पाटील आणि ज्योती चौधरी-मलिक या अंकाच्या मानकरी आहेत.

प्रायोजक : ‘पितांबरी रुचियाना गूळ’ प्रस्तुत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म २०१७’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स, बँकिंग पार्टनर आहेत डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड आणि पॉवर्ड बाय केसरी टूर्स, गुणाजी एन्टरप्रायजेस आणि गद्रे प्रीमियम सीफूडस्.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta poornabramha magazine
First published on: 13-08-2017 at 01:12 IST