मुंबई : विलेपार्ले येथे मंगळवार, दिनांक २४ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म पाककृती स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या खुल्या पाककृती स्पर्धेत भरपूर पारितोषिके जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे.राम मंदिर रस्ता, विलेपार्ले पूर्व येथील ‘लोकमान्य सेवा संघ, पार्ले’ येथे २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. इच्छुकांना कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी या ठिकाणी नावनोंदणी करून स्पर्धेत सहभाग घेता येईल. ‘नावीन्यपूर्ण पौष्टिक शाकाहारी पदार्थ’ हा या पाककृती स्पर्धेचा विषय आहे. स्पर्धकांनी असा कोणताही एकच पदार्थ घरून करून आणून स्पर्धेत मांडायचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध शेफ तुषार प्रीती देशमुख आणि ‘रुचकर मेजवानी’च्या अर्चना आरते स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. विजेत्यांना पहिल्या तीन क्रमांकांची पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच पाच उत्तम पाककृतींना उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र मिळेल. तांदळापासून बनवलेल्या पाककृतींपैकी दोन पाककृती निवडून त्यांना खास पारितोषिक दिले जाणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. या वेळी ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. आयुर्वेदिक आहार, पौष्टिक भरडधान्यांचे पदार्थ आणि रानभाज्यांच्या पाककृतींनी परिपूर्ण असा हा अंक आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta purnabrahma cooking competition today at vileparle amy
First published on: 24-01-2023 at 02:54 IST