संकेतस्थळावर नोंदणी सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणाईच्या सर्जनशीलतेला, धडपड करण्याच्या जिद्दीला दाद देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचे दुसरे पर्व सुरू झाले असून त्यात सहभागी होण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.

तरुणांना यात आपली माहिती नोंदविता येईल किंवा एखाद्या गुणी तरुणाची शिफारसही करता येईल. उपक्रमासाठी विभागीय मार्गदर्शन समितीची लवकरच घोषित करण्यात येणार आहे.

साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत तरुण पाय रोवून काम करत आहेत. विचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहात आहेत. नवे मानदंड निर्माण करत आहेत. त्यांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून करण्यात येते. गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत १२ तरुण प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात आला.

नावनोंदणीसाठी.. : लखलखत्या हिऱ्यांचे यंदाचे शोधपर्व सुरू झाले आहे. त्यासाठी तरुणांनी  http://taruntejankit.loksatta.com/methodology/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जात माहिती भरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरांनाही आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवता येईल.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta tarun tejankit award 2019
First published on: 19-01-2019 at 23:17 IST