श्री षण्मुखानंद भारतरत्न एम. एस. सुब्बालक्ष्मी संगीत शिष्यवृत्ती २७ युवा कलाकारांना १६ सप्टेंबर रोजी षण्मुखानंद सभाृहात होणाऱ्या एका कार्यक्रमात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान केली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती प्रत्येकी एक लाख रुपयांची असून ती तीन वर्षांसाठी असणार आहे. शिष्यवृत्ती मिळविलेल्यांमध्ये पं. भीमसेन जेाशी यांचा नातू विराजसह चार वर्षांचा असल्यापासून शास्त्रीय गायन शिकायला सुरुवात केलेला कर्नाटकचा एस. आकाश तसेच एन. आर. आनंद व एन. आर. कानन हे बंधू यांच्यासह अन्य युवा कलाकारांचा यात समावेश आहे.
याच कार्यक्रमात शास्त्रीय गायिका सुगुणा वरदचारी यांना एम.एस. सुब्बालक्ष्मी संगीत प्रचार पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक लाख रुपये आणि समई असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या नंतर एम.एस. सुब्बालक्ष्मी यांची नात कुमारी ऐश्वर्या सुब्बालक्ष्मी यांना आदरांजली म्हणून आपले गायन सादर करणार आहे.