भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष माधव कृष्णाजी मंत्री यांचे आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.
फोटो गॅलरी : माधव मंत्री यांना श्रध्दांजली
१९८८ ते १९९२ सालापर्यंत ते मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी होते. त्यांनी रणजी सामन्यांमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती. ते मुंबई संघाचे कर्णधार होते. १९४८-४९ साली झालेल्या रणजी करंडकामध्ये महाराष्ट्राविरुद्ध त्यांनी द्विशतक ठोकले होते. या सामन्यात दोन्ही संघाच्या मिळून २३७६ धावा झाल्या होत्या, जो आजही रणजी क्रिकेटमधला विक्रम आहे. या सामन्यात मुंबईला विजय मिळाला होता.
माधव मंत्री यांना १ मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या दुस-या हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचे आज निधन झाले. ते माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे मामा होते.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2014 रोजी प्रकाशित
माजी कसोटीवीर माधव मंत्री यांचे निधन
भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष माधव कृष्णाजी मंत्री यांचे आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

First published on: 23-05-2014 at 09:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhav mantri dies aged