निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई : राज्यातील दहशतवादविरोधी पथकाकडून आतापर्यंत प्रामुख्याने गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जोरदार कारवाई केली जात होती. मात्र मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तचर विभागाकडील दहशतवादी कारवायांची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला पुरविली जाऊ लागल्यामुळे राज्यांतील दहशतवादविरोधी पथकापुढे (एटीएस) स्रोत निर्माण करण्याचे आव्हान उभे राहिले होते. मात्र त्यात हा विभाग यशस्वी ठरला असून त्यामुळे गेल्या काही वर्षांत या विभागाच्या कारवायांमध्ये वाढ होत असल्याचे आता दिसू लागले आहे.

revised dates of mpsc exam declared soon
‘एमपीएससी’ परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच; मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक

हेही वाचा >>> वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू; आरोपी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम नको, न्यायालयाकडून गुन्हा रद्द

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने गेल्या काही महिन्यात ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’ (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित अनेकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेसोबत राज्याच्या दहशतवादीविरोधी विभागाने कारवाई केली असली तरी याबाबत स्थानिक पातळीवर अधिक माहिती उपलब्ध करण्यात या विभागाचा हात होता. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेला जोरदार कारवाई करता आली. मध्यंतरी दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे विभागानेही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पडघा येथील कारवाईतही राष्ट्रीय तपास यंत्रणेला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने मदत केली. बंदी असलेल्या स्टुडन्ट्स इस्लामिक मुव्हमेन्ट ऑफ इंडिया म्हणजे सिमीचा सदस्य असलेला साकिब नाचन याच्यासह इतरांना अटक करून आयसिसचे महाराष्ट्र मोड्युल उद्ध्वस्त केले. मात्र यासाठीही राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने ही माहिती मिळाल्यानंतर लगेचच त्याबाबत शहानिशा करून तत्परतेने कारवाई होण्यास मदत केली. आताही नाशिकमधील कारवाईही त्याचमुळे शक्य झाल्याचे या सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा >>> मुंबई : व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवर अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा

राष्ट्रीय तपास यंत्रणेला स्थानिक पातळीवरील कारवाईसाठी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे सहकार्य हवे असते. गुप्तचर माहिती आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिली जात असल्यामुळे दहशतवादविरोधी विभागाला आपले स्रोत निर्माण करावे लागत आहेत. आतापर्यंत या विभागाने काहीही केले नाही, असे म्हणता येणार नाही. मात्र गुप्तचर विभागाकडून मिळत असलेल्या माहितीमुळे स्थानिक पातळीवर या माहितीची शहानिशा करून प्रत्यक्ष कारवाई करणे शक्य होत होते. आता ही माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिली जात असली तरी स्थानिक पातळीवरील कारवाईसाठी दहशतवादविरोधी विभागाचे महत्त्व नाकारता येणार नाही, असेही या सूत्रांनी सांगितले. मात्र गेल्या काही वर्षांत दहशतवादविरोधी पक्षाने आपल्या पातळीवर दहशतवादी कारवायांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी आलेल्या संघटनेवरील कारवाईच्या वेळीही स्थानिक पातळीवर कारवाई करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकानेच राष्ट्रीय तपास यंत्रणेला सहकार्य केले होते. त्यावेळी एकाच वेळी राज्यात मोठ्या प्रमाणात कारवाई होऊ शकली, असेही या सूत्रांनी सांगितले.