आमचे आणि भाजपाचे मिळून १६५ आहेत, पुढील निवडणुकीत २०० निवडून आणू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे बाळासाहेबांचे शब्द होते अशी आठवणही यावेळी त्यांनी करुन दिली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

“मला मुख्यमंत्री करणार होते,” एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा; अजित पवारांचाही उल्लेख

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

“फडणवीसांनी एकच शपथविधी होईल असं सांगितलं होतं आणि सगळं माहिती असल्याने ते खूश होते. पण आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेतला आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सारखाच आहे. त्यांचे ११५ आणि आमचे ५० असे मिळून १६५ झाले. अजितदाद तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही निवडून येणार नाही. पण जे पूर्वी गेले ते विरोधी पक्षात गेले, हिंदुत्वाचा विरोध केला त्यांच्याकडे गेले. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार कऱणाऱ्यांकडे गेलो आहे. त्यामुळे १६५ नाही, आम्ही दोघं मिळून २०० लोक निवडून आणणार,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

‘मी पुन्हा येईन’ म्हणत टिंगलटवाळी करणाऱ्यांना फडणवीसांचा इशारा; म्हणाले “मी बदला घेणार, त्यांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्या लोकांना चिन्ह काय मिळणार वैगैरे चिंता सतावत होती. मी त्यांना म्हणालो आपण शिवसैनिक आहोत जिथे लाथ मारु तिथून पाणी काढू. ५० पैकी एकही आमदार पडू देणार नाही असं सांगितलं. भाजपाचे ११५ मिळून आम्ही २०० करणार. हा या सभागृहातला शब्द आहे,” असंही ते म्हणाले. यानंतर त्यांनी जर असं केलं नाही तर म्हणत हातवारे करताच एकच हशा पिकला. यानंतर त्यांनी ‘गावाला शेती करायला जाईन’ असं म्हणत सावरलं.