बुधवारी राज्यातील ७ सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सेवानिवृत्तीचा काही काळ उरलेला असतानाच ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली. परदेशी हे येत्या नोव्हेंबरमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. परदेशी हे गेल्या काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. शासनाने मराठी भाषेचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केल्याच्या काही तासांनंतर प्रवीण परदेशी यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि बुधवारी केंद्र सरकारच्या नॅशनल कॅपिसिटी बिल्डिंग कमिनशने सदस्य म्हणून प्रशासनात रुजू झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, परदेशी आपल्या नव्या भूमिकेत केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संसाधने तयार करण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये आणि प्रशिक्षण संस्था यांच्याशी समन्वय साधून देखरेख ठेवतील. पंतप्रधानांच्या सार्वजनिक मानव संसाधन परिषदेला वार्षिक क्षमता वाढवण्याच्या योजनांना मान्यता देण्याचे काम या आयोगातर्फे करण्यात येणार आहे. आयोगातर्फे मानवी संसाधन व्यवस्थापन आणि नागरी नोकरदारांसाठी क्षमता वाढवण्याच्या क्षेत्रात आवश्यक असलेल्या धोरणात बदल सुचवण्याचे काम करण्यात येणार आहे.

More Stories onआयएएसIAS
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra former bmc chief praveen pardeshi quits state post hours after appointment joins centre ncbc abn
First published on: 01-07-2021 at 11:21 IST