गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मंगळागौरीच्या कार्यक्रमांनी लक्ष वेधून घेतले आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानंतर मंगळागौरची क्रेझ प्रचंड वाढली आहे. हल्ली अनेक ठिकाणी मंगळागौरीच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला विविध कलाकारांसह राजकीय नेत्याही सहभागी होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही मंगळागौरीचा आनंद लुटला. त्यावेळी त्यांनी फारच सुंदर उखाणा घेतला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात विविध खेळ खेळल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी सुंदर उखाणा घेतला.
आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

रुपाली चाकणकरांचा उखाणा

“मुलगी आहे निसर्गाचा उपहार, जगण्याचा तिला ही आहे अधिकार
सगळे मिळून करु हट्ट, शिक्षणाचा तिचाही हक्क,
निलेश रावांचं नाव घेते ही एक आस, स्त्रीभ्रूण हत्या मिटवूया हमखास”, असा उखाणा रुपाली चाकणकरांनी घेतला.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या नातवाचे झालं बारसं, नावाचा अर्थ माहितीये का?

दरम्यान या कार्यक्रमासाठी रुपाली चाकणकरांनी पिवळ्या रंगाची छान नऊवारी साडी परिधान केली होती. तसेच त्यांनी पारंपारिक लूकही केला होता. रुपाली चाकणकरांनी उखाणा घेतलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.