एका विशिष्ट जमातीच्या दरोडेखोरांनी रचलेला दरोडय़ाचा कट मालाड पोलिसांनी मोठय़ा शिताफीने उधळून लावला असून या प्रकरणी सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
दशरथ शिंदे, दिलीप शिंदे, अंबादास शिंदे, संतोष शिंदे, लक्ष्मण घाटाळ आणि सुनिल शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते सर्वजन सराईत खतरनाक दरोडेखोर आहेत. या टोळीतील काही जणांनी मालाड येथील जया निवास इमारतीची रेकी केली होती. दरोडयासाठी ही टोळी ट्रकमधून येणार असल्याची खबर मिळताच मालाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र सावंत, सहाय्यक निरीक्षक नवनाथ सोनवणे, झापडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटे साध्या वेशात जया निवास स्थानाच्या आसपास सापळा रचला होता. दरम्यान एका ट्रकमधून आलेल्या काही जणांच्या हालचाली संशयास्पद जाणवताच पोलिसांनी त्यांची धरपकड केली. त्यांच्या जवळून हत्यारांसह लिंबू हळद, कुंकू, तिखट आदी जप्त करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2013 रोजी प्रकाशित
मालाड पोलिसांनी दरोडय़ाचा कट उधळला
एका विशिष्ट जमातीच्या दरोडेखोरांनी रचलेला दरोडय़ाचा कट मालाड पोलिसांनी मोठय़ा शिताफीने उधळून लावला असून या प्रकरणी सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
First published on: 27-09-2013 at 12:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malad police arrest 6 robber while planning of robbery