रघुनाथनगर परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय युवतीचा बलात्कार करून तिला धमकी देणाऱ्या तरुणास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. ब्रिजेश रामा राणे (२६), असे अटक केलेल्या तरूणाचे नाव असून तो वागळे इस्टेट परिसरातील हाजुरी भागात राहतो. संबंधित १६ वर्षीय युवती घरात एकटीच असताना त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली. महिनाभरापुर्वी ही घटना घडली. पिडीत युवतीने सोमवारी दिलेल्या तक्रारीवरून ब्रिजेशला अटक केली.किसननगर भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय युवतीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच लग्न केले नाहीतर चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकीही त्याने दिली होती. अंकीत गुणवंत सोनी (२२), यास अटक केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2013 रोजी प्रकाशित
युवतीवर बलात्कार करणाऱ्यास अटक
रघुनाथनगर परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय युवतीचा बलात्कार करून तिला धमकी देणाऱ्या तरुणास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. ब्रिजेश रामा राणे (२६), असे अटक केलेल्या तरूणाचे नाव असून तो वागळे इस्टेट परिसरातील हाजुरी भागात राहतो.
First published on: 08-01-2013 at 03:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for raping 16 year girl