अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाविषयी अफवा पसरविणाऱ्या एका युट्युबरला पोलिसांनी अटक केली आहे. या व्हिडीओमधून महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्याविषयी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे सायबर सेलने ही कारवाई करत संबंधित युवकाला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुशांत सिंह राजपूतच्या निधनाविषयी अफवा पसरविल्याप्रकरणी ओमर सर्वांग्य या तरुणाला अटक करण्यात आली. ओमरविरुद्ध कलम ५०२(२), ५००, ५०१ आणि ५०४ अंतर्गत बदनामी करणे, अपमान करणे आणि द्वेष निर्माण करणे या कलमांअंतर्गंत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सध्या या प्रकरणी सीबीय,ईडी आणि एनसीबीमार्फत चौकशी सुरु असून रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा यांना सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested in mumbai for spreading fake news related to case of actor sushant singh death ssj
First published on: 07-09-2020 at 13:56 IST