Premium

मुंबई: पेव्हर ब्लॉक डोक्यात मारून एकाची हत्या

पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणातून सांताक्रुझ येथे गुरुवारी काठी व पेव्हर ब्लॉकने केलेल्या मारहाणीत ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

man killed by hitting paver block
सांताक्रुझ पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणातून सांताक्रुझ येथे गुरुवारी काठी व पेव्हर ब्लॉकने केलेल्या मारहाणीत ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राजेशकुमार शुक्ला (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्ला याचे आरोपीसोबत पूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून आरोपीने काठी, पेव्हर ब्लॉक व छत्री याने शुक्लाला मारहाण केली. शुक्लाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो खाली कोसळला. त्यानंतर शुक्लाला तातडीने कुपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आणखी वाचा-व्हेल माशाच्या उलटीप्रकरणी उच्चशिक्षीत तरूणासह दोघांना अटक

सांताक्रुझ पश्चिम परिसरातील एस.व्ही. रोडवरील दिलखुश सोसायटीत ही घटना घडली. पोलिसांनी याबाबत सुरक्षा रक्षकाला विचारणा केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. सुरक्षा रक्षक मकरबहादुर सिंह याच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. ही संपूर्ण घटना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यावर पांडे नावाच्या व्यक्तीने शुक्लाला मारल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी पांडेचा शोध सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man killed by hitting paver block on head mumbai print news mrj

First published on: 29-09-2023 at 16:42 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा