एका व्यक्तीने रागाच्या भरात कुत्र्याच्या पिलास इमारतीच्या दुस-या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना उपनगर मुंबईतील अंबरनाथमधील दुर्गावाडी पाडा येथे घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेची माहिती समजताच प्राणी प्रेमींनी या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे. सोमवीरी सकाळी एका भटकलेल्या  कुत्र्याच्या पिल्लाने येथील साई सावली इमारतीमध्ये प्रवेश केला व ते भुंकू लागले. यामुळे संतप्त झालेले येथील रहिवासी बुद्धीराम प्रसाद यांनी या पिलास इमारतीच्या दुस-या मजल्यावरून खाली फेकले.

यामुळे या पिलास गंभीर दुखापत झाली शिवाय त्याच एक पाय देखील निकामी झाला आहे. त्यावर सध्या उपचार सुरू आहे. हा प्रकार प्राणी प्रेमी असलेल्या पिंकी डेव्हीड यांनी पाहिला व त्यांनी या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करत, त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man throw puppy from second floor msr87
First published on: 19-06-2019 at 16:17 IST