संजय दत्तची पत्नी मान्यताला उपचारासाठी ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर अजय चौगुले यांनी दिली आहे. तिचा नेमका आजार काय आणि पुढचे उपचार कशाप्रकारे करण्यात येणार आहेत, याविषयीचे तपशील आताच देता येणार नाहीत, असे चौगुले यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात मान्यताला यकृतात गाठ असल्याचे निदान झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, सध्या तिच्या विविध चाचण्या सुरू आहेत. तिची प्रकृती आता कशी आहे, याबद्दल आताच काही सांगता येणार नसल्याचे चौगुले म्हणाले.