राजू परुळेकर –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा पोलिसांकडून नागरिकांना उर्मट दिली जात असल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. मात्र असंच उर्मट देणं एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला चांगलंच महागात पडलं आहे. आठमुठेपणाने उत्तर दिल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला तातडीने साईट ब्रांच एसबी-2 येथे बदलीची नामुष्की पत्करावी लागली आहे. विलास गंगावणे असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.

मागील आठवड्यात मरीन लाईन्स पोलिसांनी मरीन ड्राइव्ह या ठिकाणी नाकाबंदी लावली होती. या नाकाबंदीला स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे जातीने उपस्थित होते. नाकाबंदी सुरु असताना दुसऱ्या बाजूला मॉर्निग वॉक करणाऱ्यांची वर्दळ होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे नाकाबंदीवर लक्ष ठेवून असताना एक दुचाकी त्यांच्यासमोरुन गेली. त्या दुचाकीवर तिघेजण असतानाही विलास गंगावणे यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही.

हा प्रकार मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका न्यायाधीशांनी पाहिला. यावर नाकाबंदी पोलिसांची आणि खुद्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांची कुठलीच हालचाल न पाहिल्याने त्या न्यायाधीशांनी विलास गंगावणे यांना आपण त्या ट्रिपल सीट बाईकस्वाराला पकडा असे सांगितले. यावर विलास गंगावणे यांनी त्यांनी उर्मट शब्दात उत्तर दिले आणि तिथे त्यांची फसगत झाली.

‘मी काय स्पायडरमॅन आहे काय त्यांना पकडायला’, असं उत्तर देत विलास गंगावणे यांनी न्यायाधीशांचा प्रश्न धुडकावून लावला. न्यायाधीशांनी काहीही प्रतिकार न करता निघून गेले. पण रोज कायदा मोडणाऱ्यांना जाब विचारणारे न्यायाधीश यांनी दुसऱ्या दिवशी पोलीस आयुक्तांना फोन करून सांगितले. अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर मुंबई पोलीस आयुक्तानी विलास गंगावणे यांची एसबी-2 येथे तडकाफडकी बदली केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marine lines senior police inspector transfered for arrogant answer to judge
First published on: 07-12-2018 at 23:25 IST