अन्नातील भेसळ रोखण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली असून दुधात भेसळ करणाऱ्यांना किमान वर्षभर तुरुंगात सडविण्यासाठी हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात येणार आहे. त्यासाठी गृह विभागाला विनंती करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयातही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर जिल्ह्य़ातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध संकलन केंद्रावर रसायनांचा साठा जप्त करण्यासंदर्भातला प्रश्न भारत भालके, अजित पवार, डॉ. पतंगराव कदम, गणपतराव देशमुख, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आशीष शेलार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. राज्यात सर्वत्र दुधात भेसळ केली जात असून मुंबईत तर अशा टोळ्याच कार्यरत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर बोलताना दुधात भेसळ होत असल्याचे बापट यांनीही मान्य केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milk adulteration proposal in maharashtra monsoon session
First published on: 26-07-2016 at 02:09 IST