देवनार येथे पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी या पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या इम्रान खान (२१) या तरुणाला अटक केली आहे. १२ जुलै रोजी ही पीडित मुलगी घराशेजारी खेळत असताना खानने तिला आपल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी कुठेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. भीतीपोटी ही मुलगी गप्प राहिली होती. अखेर शुक्रवारी तिने आपल्या आजीला या प्रकाराची माहिती दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. देवनार पोलिसांनी इम्रानला अटक केली असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. इम्रान हा बांधकाम मजूर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor raped in mumbai
First published on: 21-07-2013 at 05:12 IST