आगामी विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे संभावित उमेदवार तसेच मिरा भाईंदर शहर प्रमुख प्रसाद सुर्वे यांनी पंचवीस पदाधिकारी आणि मनसे कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. शेकडो मनसेसैनिकांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे मिरा भाईंदर मधील राजकारणाला वेगळे वळण आल्याचे दृश निर्माण झाले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शंभर पेक्षा अधिक जागेंवर विधानसभा निवणूक लढण्याचा र्निणय घेतला आहे. राज ठाकरे सोमवारी संभावित उमेदवारांची यादी जाहीर करणार असतानाच मनसे संभावित उमदेवार म्हणून चर्चेत असलेल्या नावांपैकी मिरा भाईंदर शहर प्रमुख यांनी मनसेला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे .
मिरा भाईंदर भाजप विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थित रविवारी सकाळी मनसे शहर प्रमुख आणि पंचवीस पदाधिकारी यांनी भाजप पक्षात पक्षप्रवेश केला. राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक प्रसाद सुर्वे यांनी निवडणुकीच्या तोंडावर घेलेल्या निर्णयामुळे वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे.