शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उपस्थित झाला. आमदार यामिनी जाधव यांनी शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याचं सांगत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी या प्रकारामुळे शीतल म्हात्रेंचं आयुष्य बरबाद होईल, असा इशाराही दिला. त्या सोमवारी (१३ मार्च) सभागृहात बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामिनी जाधव म्हणाल्या, “शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी. त्या माझ्या सहकारी आणि नगरसेविका होत्या. राहिलेल्या प्रतिष्ठीत महिलेबाबत रॅलीतील व्हिडीओची मॉर्फींग झाली आहे. एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही असं कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचं.”

“या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल”

“यावर कधी कारवाई होणार? या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल. ती विवाहीत महिला आहे. ज्याने हे केलं त्यावर कारवाईचे आदेश द्यावेत,” अशी मागणी यामिनी जाधव यांनी केली.

व्हिडीओ पाहा :

“आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हिडीओ व्हायरल”

आमदार मनिषा चौधरींनीही हा मुद्दा उपस्थित करत दोषींवर कारवाईची मागणी केली. मनिषा चौधरी म्हणाल्या, “एका आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ही अतिशय निंदनीय बाब आहे. हा व्हिडीओ पहिल्यांदा कुणी मॉर्फ केला त्याला शोधून काढावं.”

“उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते, कारण…”

“आज हा प्रकार आज एका आमदार आणि महिलेबरोबर झाला, उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. कारण कुठलाही माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो ते आम्ही व्हिडीओत बघितलं. त्या उद्घाटनाला मीही उपस्थित होते. महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते,” असं मनिषा चौधरी यांनी सांगितलं.

हेही वाचा : VIDEO: “खत हवं असेल, तर जात सांगा”, जयंत पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, “शेतकऱ्याला त्याची…”

“एखादा डोकेफिरू नवरा असेल, तर त्या महिलेचा…”

“एखादा डोकेफिरू नवरा असेल, तर त्या महिलेचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. एखादा पुरुष आमदार असेल, तर त्या महिलेचं डोकं फिरून तीही त्या पुरुषाला आपल्या संसारातून बाहेर काढू शकते,” असंही चौधरी यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla yamini chauadhari comment on sheetal mhatre viral video with prakash surve in maharashtra assembly session pbs
First published on: 13-03-2023 at 14:40 IST