सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना राज्य महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. आमदार परिचारक यांनी आयोगासमोर हजर राहण्याचेही आदेश देण्यात आल्याचे वृत्त महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हवाल्याने वृत्त वाहिन्यांनी दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत परिचारक यांनी जवानांच्या पत्नींबाबत संतापजनक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात उमटलेल्या पडसादानंतर परिचारक यांनी याबाबत माफीही मागितली होती. परंतु्, त्यांच्या माफीनाम्यानंतरही राज्यभरात त्यांच्याविरोधात माजी सैनिकावंच्या संघटनांनी निषेध केला होता. अनेक ठिकाणी मोर्चेही काढण्यात आले होते. त्यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला होता.
पंढरपूर शहरात यानिमित्त बंद आंदोलन पुकारण्यात आला होता. यात जिल्ह्यातील माजी सैनिकांनी मोर्चा काढून परिचारक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी तहसीलदारांनाही निेवदेन दिले होते. या वक्तव्याप्रकरणी परिचारक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. या सर्वांची दखल अखेर महिला आयोगाला घ्यावी लागली. या प्रकरणी त्यांनी आता परिचारक यांना नोटीस बजावली आहे. परिचारक यांना आता आपले म्हणणे महिला आयोगासमोर मांडावे लागणार आहे. आमदार परिचारक हे विधानपरिषदेत भाजप पुरस्कृत आमदार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mlc prashant paricharak pandharpur army man wifes controversial statement mahila ayog notice
First published on: 27-02-2017 at 11:34 IST