मुंबई महानगरपालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) गटनेते संदिप देशपांडे यांनी पालिका सभागृहात वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले. नवऱयाच्या जीवावर निवडून येणाऱयांनी मला शिकवू नये, असं बेधडक वक्तव्य संदीप देशपांडे यांनी बुधवारी भर पालिका सभागृहत केलं. देशपांडे यांच्याविधानावर सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि केलेल्या विधानावर देशपांडे यांनी माफी मागावी अशी मागणी नगरसेविकांनी लावून धरली.
डेंग्यूबाबत पालिका सभागृहात चर्चा सुरू असताना देशपांडे यांनी हे विधान केले. सुरूवातीला संदीप देशपांडे यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला पण, त्यानंतर नगरसेविकांना आक्रमक पवित्रा घेतल्याने कामकाज १० मिनिटे तहकूब करावे लागले. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर नगरसेवकांनी संदिप देशपांडे यांची समजूत काढली आणि अखेर देशपांडे यांनी सभागृहात केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns corporator sandeep deshpande controversial statement
First published on: 26-11-2014 at 06:37 IST