“झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या मुंबईतील आजीबाईंच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असताना मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला गैरहजर राहत आजींची भेट घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजींची भेट घेतल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे. आजींच्या निमित्ताने का होईना घराबाहेर तर पडले अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली आहे.

vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

“झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणार्‍या ९२ वर्षांच्या आजीबाईंची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट!

“त्या आजींचा सत्कार केला पाहिजे, त्यांच्या निमित्ताने का होईना घराबाहेर तर पडले; धन्यवाद आजी”, असं संदीप देशपांडे ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसेना कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले होते. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी राणा दाम्पत्याने थेट मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर अनेक शिवसैनिकांसह ९२ वर्षांच्या चंद्रभागा आजी देखील मातोश्रीबाहेर थांबल्या होत्या. तसंच त्यांनी थेट राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करत ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये “झुकेगा नहीं साला” म्हणत इशारा दिला होता.

“रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे”

चंद्रभागा आजींचा जोश पाहून आसपासच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील “रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे” अशी घोषणाबाजी केली होती. “रवी राणा दोन दिवस मातोश्रीवर आमच्या वहिनींना आणि सगळ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना कार्यकर्ते त्याला इंगा दाखवणार आहोत. तुझी हिंमत कशी झाली?”, असा सज्जड सवालच आजीबाईंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

“आमच्या साहेबांवर आलेलं संकट आम्ही दूर करणार नाही का? साहेबांसाठी आम्ही झटणार. तिला (नवनीत राणा) वाटतं दोघंजण येऊ आणि गुपचूप जाऊ, पण आम्ही भिणार नाही. तू आमच्या समोर ये. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही. तुम्ही मातोश्रीवर येऊन दाखवाच”, असं आव्हान आजीबाईंनी दिलं होतं.

उद्धव ठाकरेंचा आजीबाईंना फोन!

दरम्यान, चंद्रभागा आजींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच मातोश्रीमधून त्यांना फोन करून बोलावून घेतलं होतं. यावेळी फोनवर देखील चंद्रभागा आजींनी उद्धव ठाकरेंना तुमच्यासाठी आम्ही इथं बसलो असल्याचं सांगितलं होतं. “उद्धव ठाकरेंनी सांगितलं की काळजी घ्या. फार वेळ बसू नका. चहापाणी झालं. मी म्हटलं साहेब जय महाराष्ट्र, तुमच्यासाठी आम्ही इथे बंगल्याच्या बाहेर उभे आहोत. ती कशी येतेय ते बघू आम्ही. मी इथेच बसणार. मातोश्रीवर तुम्हाला कुणी काही बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही”, असं उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितल्याचं चंद्रभागा आजीनं सांगितलं होतं.