तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची वाहतूक बंद पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे मोनोरेलची वाहतूक ठप्प झाली आहे. वाशी नाका परिसरात मोनोरेल बंद पडली असून यामुळे पुढील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मोनोरेल ठप्प पडल्याने अग्निशमन दलाच्या मदतीने प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. प्रवाशांना शिडीच्या सहाय्याने एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये हलवण्यात आलं.

दरम्यान दुपारी एक वाजता मोनेरेल पुन्हा सुरु करण्यात येईल अशी माहिती एमएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली आहे.