दादरा हवेलीचे खासदार मोहनभाई संजीभाई देलकर (वय- ५९) यांचा मृतदेह मारिन ड्राईव्ह येथील सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन देलकर हॉटेलमधील ज्या खोलीत होते, तिथे गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट देखील पोलिसांना आढळून आली आहे.  मोहन देलकर हे अपक्ष खासदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी कालाबेन देलकर व दोन मुलं अभिनव व दिविता असा परिवार आहे.

मोहन दलेकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत(सुसाइड नोट) काही बड्या लोकांची नावं असण्याची  देखील शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ही सुसाइड नोट पोलिसांच्या ताब्यात आहे.

१९८९ मध्ये पहिल्यांदा मोहन दलेकर हे दादरा हवेलीचे खासदार म्हणून लोकसभेत गेले होते. त्यानंतर ते अनेकदा खासदार झाले. भारतीय नवशक्ती पार्टीचे देखील ते खासदार झाले होते. २००९मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र मागील लोकसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp mohanbhai delkars body found in mumbai hotel msr
First published on: 22-02-2021 at 15:49 IST