मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे दोन पदाधिकारी यांच्यावर बॅलार्ड पीअर येथील ३८ व्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी आज (शुक्रवार) आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी दरेकर यांना पोलिसांनी अटक केली. मात्र उच्च न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची लगेच जामीनावर सुटका केली. दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेले आरोपपत्र ९०५ पानांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबै बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांनी मजूर या प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. ते बिनविरोध निवडून आले होते. मात्र दरेकर हे बोगस श्रीमंत मजूर असल्याची वृत्तमालिका ‘लोकसत्ता‘ने १० ते १२ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेची दखल घेत सहकार विभागाने दरेकर यांच्यावर कारवाई का करू नये, या बाबत नोटिस बजावली. या प्रकरणी दरेकर यांनी प्रतिनिधीमार्फत केलेला युक्तिवाद समाधानकारक नसल्याचे स्पष्ट करीत मुंबई विभागाच्या सहनिबंधकांनी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai bank case praveen darekar arrested and released chargesheet also filed msr
First published on: 13-05-2022 at 21:59 IST