मुंबईतील भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. राणी बागेतील नव्या प्राणी-पक्ष्यांमुळे उद्यानातलं वातावरण हे नेहमी खेळत राहत असल्याचे पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी राणीच्या बागेत पेंग्विनच्या दोन पिल्लांचां जन्म झाला. यातील ओरिओ या पेंग्विनचा पहिला वाढदिवस नुकतंच पार पडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई महापालिकेने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राणीच्या बागेतील कर्मचारी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात ओरिओचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला मुंबई महापालिकेने ‘ओरिओ वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी पेंग्विन कक्षात वाढदिवसानिमित्त केलेली सजावट दाखवली आहे. त्यासोबतच त्याचा एक फोटोही या कक्षाजवळ लावण्यात आला आहे.

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
Hardik Pandya Reacts To Defeat
IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

“हनुमान चालिसा आणि अजानचे पावित्र्य तेवढंच…”, भोंगा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया

विशेष म्हणजे ओरिओच्या वाढदिवसानिमित्त एक खास केकही बनवण्यात आला होता. हा केक पेंग्विनच्या कक्षात ठेवण्यात आला होता. हा केक पाहून ओरिओदेखील फार खूश असल्याचे दिसत आहे. यावेळी ओरिओच्या वाढदिवसानिमित्त राणीबागेतील कर्मचाऱ्यांनीही केक कापत आनंद साजरा केला. याचा खास व्हिडीओही सध्या चांगलाच चर्चेत आहे.

“कोकणातल्या माणसासोबत लग्न झालं आणि…”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात डोनाल्ड आणि डेझी ही हम्बोल्ट पेंग्विनची जोडी आहे. या जोडीने १ मे २०२१ रोजी एका पिलाला जन्म दिला होता. त्यांनी त्याचे नाव ओरियो असे ठेवण्यात आले आहे. त्यानंतरच तर मॉल्ट आणि क्लिपर या पेंग्विनच्या जोडीनं जन्म दिलेल्या पिलाचं नाव ऑस्कर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता पेंग्विन कक्षात एकूण ९ पेंग्विन झाले आहेत.