scorecardresearch

“कोकणातल्या माणसासोबत लग्न झालं आणि…”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हेमांगी कवीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकतंच हेमांगीने तिच्या नवऱ्यासंबंधी लग्नानंतर तिच्या खाण्यात कशाप्रकारे बदल झाला, याबाबतची पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगी कवीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हेमांगी कवीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने कोळी वेशभूषा केली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. त्यासोबत तिने एक हटके पोस्ट केली आहे.

“…तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी कुठे जायचे?”, रितेश देशमुखचा संतप्त सवाल

हेमांगी कवीची इन्स्टाग्राम पोस्ट

“ही पोळी साजूक तुपातली हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद!

लग्नाच्या आधी मी फार कमी, कमी म्हणजे नाहीतच जमा, मांसाहार करायचे, मधली ६ वर्ष तर मी अंड सुद्धा खाल्लं नव्हतं. इतकी vegetarian होते. पण मग पुढे लग्न झालं कोकणातल्या माणसासोबत आणि मग काय हळू हळू मांसाहार वाढत गेला. तेव्हावरील ओळी चपखल आपल्यासाठीच लिहिल्या आहेत असं वाटतं! असं vegetarian to non- vegetarian कोण कोण झालंय सांगा पाहू? बरं ते जाऊदे… आज कालवणास काय केलंय ते सांगा!”, असे तिने म्हटले आहे.

हेमांगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. यातील अनेकांनी आपल्या खाण्याच्या आवडीबद्दल सांगितलं आहे. हेमांगी कवीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे.

“…आणि मुंबईच्या राजभवनात जाण्याचा योग आला”, राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यानंतर प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हेमांगी कवी ही सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत सुशील इनामदारही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ‘लेक माझी दुर्गा’ ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress hemangi kavi share interesting post on non vegetarian food love after marriage nrp

ताज्या बातम्या