मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहेत. आधी मनसेचा पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात घेतलेली उत्तर सभा आणि शेवटी १ मे रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेदरम्यान राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेवरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना दिसत आहे. नुकतंच या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता सोनू सूद हा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. नुकतंच सोनू सूदने शिर्डीतील श्री साईबाबा मंदिराचे दर्शन घेतले. यादरम्यान त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी सोनू सूदने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि भोंगा मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोनू सूदने प्रतिक्रिया दिली.

colors marathi announces new marathi serial abeer gulal
नव्या मालिकांचा सपाटा! ‘कलर्स मराठी’ने केली नव्या मालिकेची घोषणा, जबरदस्त प्रोमो आला समोर
Laapataa Ladies on OTT
किरण रावचा ‘लापता लेडीज’ ओटीटीवर आज होणार प्रदर्शित, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? जाणून घ्या
web series released on OTT this week
वीकेंडचा प्लॅन नाही? ओटीटीवर घरबसल्या पाहा ‘हे’ सिनेमे अन् वेब सीरिज, याच आठवड्यात झालेत प्रदर्शित
govinda attended niece Arti singh wedding
Video: मामा-भाच्याचं वैर, पण भाचीच्या लग्नाला पोहोचला गोविंदा; आरती सिंहबद्दल म्हणाला…

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ शो होणार बंद, पोस्ट शेअर करत म्हणाला “फार दु:ख होत आहे की…”

यावेळी तो म्हणाला, “मला असे वाटतं की देशाचा विकास तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा आपण धर्म, जाती या सर्वातून बाहेर पडू. देशाला एकत्र होणे फार महत्त्वाचे आहे. जी ताकद हनुमान चालिसामध्ये आहे. तीच ताकद नमाज किंवा अझानमध्ये असते. या दोन्हीही ऐकण्यासाठी तितक्याच चांगल्या वाटतात. त्याचे पावित्र्यही तेवढेच आहे. धर्म हा लोकांनी बनवला आहे. यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. देशात रोजगार किंवा इतरही अजून समस्या यांसारखे खूप मोठे मुद्दे आहेत. त्यामुळे जर आपण याच गोष्टीत अडकून राहिलो तर लोकांच्या समस्या कधीही संपणार नाही. त्यापुढे इतर कोणत्याही गोष्टींचा फरक पडत नाही.”

दरम्यान राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसेनं आजपासून सुरू केलेल्या आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. “दिवसभर जी काही चार-पाच वेळा बांग दिली जाते, त्यांची प्रार्थना म्हणतात ती जर परत त्यांनी दिली तर आमचे लोक त्या त्या वेळा हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या डेसिबलचं पालन करावं लागेल. लोकवस्तीमध्ये ४५ ते ५५ डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकता. आम्हाला सणांसाठी दिवस बघून परवानगी देता आणि यांना ३६५ दिवस परवानगी देता ती कशासाठी? ४५ ते ५५ डेसिबल म्हणजे आमच्या घरचे मिक्सर जेवढे वाजतात तेवढा आवाज”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“…आणि मुंबईच्या राजभवनात जाण्याचा योग आला”, राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यानंतर प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होतो याचा विचार त्यांनी करायचा. प्रार्थना म्हणू नका असं मी म्हणत नाही. तुमच्या घरात म्हणा. धर्म हा तुमच्या घरात असला पाहिजे. तुमच्या घरात प्रार्थना करा”, असं राज ठाकरे यावेळी सांगितले.